देश

ब्रेकिंग : कोविशिल्ड कोरोना लसीला मिळाली आपत्कालीन वापरासाठी भारतात मंजूरी

वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर विकसित करण्यात आलेल्या लसीला भारत सरकारने मान्यता दिली आहे. सर्च एक्सपर्ट कमेटीने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली आहे.

कोरोनाची देशातील पहिली लस कोणती असेल, यावर तज्ज्ञांच्या पॅनेलने आपल्या शिफारसी केंद्र सरकारला सादर केल्या. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रेझेंटेशन झाले आहे. ज्यासह कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे.

आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII), भारत बायोटेक आणि फायझर यांनी आपत्कालीन वापरासाठी देशात अर्ज केले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड नावाची लस तयार करत आहे, जी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट शिवाय स्वदेशी लस कोवॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेकने बुधवारी पॅनेलसमोर एक प्रेझेंटेशन दिलं. तर फायझरला आपत्कालीन वापरासाठी डब्ल्यूएचओने एक दिवस अगोदर मंजूरी दिली आहे.

ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड लसीकडून सरकारला मोठी अपेक्षा आहे कारण ती परवडणारी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की अगोदर आपल्या घरगुती बाजारावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यानंतर दक्षिण आशियाई देश आणि आफ्रिका येथे निर्यात केली जाईल.

जगातील सर्वात मोठी लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सोमवारी माहिती दिली होती कि, ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसचे सुमारे पाच कोटी डोस आधीच तयार झाले आहेत. तसेच, मार्चपर्यंत 10 कोटी आणि जूनपर्यंत 30 कोटी लस बनवण्याची योजना आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी भारताने तयारी पूर्ण केली आहे. संपूर्ण योजना तयार आहे. भारतातील कोरोनाची लस मोहीम खूप व्यापक असेल, हे निश्चित आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago