क्रीडा

रोहित शर्मा उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये असेल भारतीय संघाचा उपकर्णधार

हिटमॅन रोहित शर्मा क्वारंटाईन पिरियड संपवून नुकताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सहभागी झाली आहे. तसेच त्याने शुक्रवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव सुरु केला आहे.

निवड समितीने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले असून दोन्ही संघांनी त्यापैकी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. तर अजिंक्य रहाणे दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यात म्हटलं की, रोहित शर्माकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रोहित शर्माचे सराव करतानाचे दोन फोटो शेअर केले होते. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने म्हटलं होतं की, इंजिन स्टार्ट होतंय आणि जे पुढे होणार आहे त्याची ही छोटी झलक आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago