In Pune, a young woman was chased, abducted and raped
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर येथे रस्त्यात अडविले. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवरून खराडी परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी येत होती. ती घरी निघाल्यानंतर तिचा आरोपीने पाठलाग सुरू केला. तिला टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसविले. तरुणीला पुन्हा खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला गुंजन चौक परिसरात आणून सोडले.
पीडित तरुणीने मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अपहरण, बलात्कार, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…