काम-धंदा

मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहावर मोठी कारवाई

मुंबई : सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी सेबीने (Securities and Exchange Board of India – SEBI) ही कारवाई केली. शेअर घोटाळा केल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० कोटी रुपये आणि मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड केला.

रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी दोषी ठरवून सेबीने सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई केली. दोषी ठरलेल्यांनी सामूहिकरित्या नोव्हेंबर २००७ मध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप सेबीने लावला आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशा स्वरुपाच्या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला.

सेबीचे अधिकारी बी जे दिलीप यांनी ९५ पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गैरव्यवहारांची कल्पना येणे शक्य नव्हते. याच कारणामुळे फसवणुकीच्या उद्देशाने शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याप्रकरणीही सेबीने कारवाई केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago