Water problem in Pune city will be solved, Bhama-Askhed water supply scheme was inaugurated
पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची अडचण दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. भामा- आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पूर्व भागातील पाण्याची अडचण दूर होणार आहे. नदी सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प महत्त्वाचे असून ज्या शहरात पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळते ती शहरे झपाट्याने वाढतात, त्यामुळे पाणी व्यवस्थेसोबतच शहरातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात. आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया यावर मोठा भर देण्यात आला. तो याहीपुढे कायम ठेवला पाहिजे. त्यातून सिंचनाच्या पाण्यावर ताण येणार नाही. पुण्यातील प्रदूषण कमी करायचे असेल तर वाहतुकीच्या विविध साधनांकडे अगत्यपूर्वक लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भामा-आसखेड ही पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज या योजनेमुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…