महाराष्ट्र

गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? घ्या हि काळजी..

नाशिक : गॅस गिझर फुटल्याने गौरव पाटील युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरात घडली. गौरव शुक्रवारी दुपारी अंघोळ करत असताना हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पाटील त्याच्या घरात बाथरुममध्ये अंघोळ करत होता. यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यानंतर गौरवला गुदमरायला लागले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारमुळे त्याचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तत्काळ बाथरुमकडे धाव घेत गौरवला बाहेर काढले. त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्या मित्रांनी त्याला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, श्वास घेण्यास जास्तच त्रास जाणवू लागल्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, गौरवच्या अशा अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच, गॅस गिझर वापरतना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

तुम्ही जर गॅस गिझर वापरत असाल तर काळजी घ्याल?

  1. गॅस गिझरमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड हा गॅस शरीरासाठी हानिकारक असतो. तो रंगहीन असल्यामुळे गॅस गिझर लीक झालेले कळूनही येत नाही. त्यामुळे गॅस गिझर लीक झाल्याची थोडी जरी शंका आली तर गॅस गिझर बंद करावे.
  2. कार्बन मोनॉक्साईड श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे काही मिनिटांत चक्कर येते. अशी काही लक्षणं आढळल्यास तत्काळ बाथरुमच्या बाहेर यावे.
  3. गॅस गिझर लावताना बाथरुममध्ये मोकळी जागा आणि नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा आहे का?, याची चाचपणी करावी. तसेच, बाथरुम मोठे असेल तरच गॅस गिझर लावावे.
  4. बाथरुममध्ये जाण्यापूर्वी गॅस गिझर बंद केलेलं होतं का याची खात्री करुन घ्या.
  5. कार्बन मोनॉक्साईड शरीरात गेल्यानंतर घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करा.
  6. रुग्ण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तुमच्या तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न करु नाका. कारण त्यामुळे तुम्हाच्याही शरीरात कार्बन मोनॉक्साईट हा वायू जाण्याची शक्यता असते.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

4 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

7 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

7 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

1 आठवडा ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

1 आठवडा ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

1 आठवडा ago