BJP workers killed by terrorists
जम्मू-काश्मीर : कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या या तिन्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
पोलिस म्हटले की, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवा सरचिटणीस फिदा हुसैन यातू, भाजप कार्यकर्ता उमर राशिद बैग आणि उमर रमजान हाजम या तिघांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. हे तिघेही वाईकेपूरा येथील निवासी होते.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा ट्विट करून निषेध केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…