If they threaten to run the state, why point the finger at the Center
अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा सवाल करत तुम्ही सर्व तत्व पायदळी तुडवून सत्ता स्थापन केलीये. तर मग सत्ता टिकवण्याचे तुमचे काम आहे, असं विखे म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक हाती सत्तेच्या आव्हानावरुन शरद पवारांनी स्पष्ट केलं की मी हे 30 वर्षापासून ऐकतोय. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारमध्ये जो बेबनाव तयार होत चाललाय त्याचं हे उदाहरण असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. दुर्दैवाने सरकारकडे नियोजन नाही तर फक्त सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची कसरत चाललीये, सरकारच्या अजेंड्यावर सामान्य माणूस आहे ना शेतकरी… फक्त मुठभर लोकांसाठी सत्ता टिकवण्याची धडपड महाराष्ट्रात सुरु आहेत. बहुतेक मंत्र्यांचे लक्ष आपल्या विभागातील बदल्यांकडे आहे. राज्याच्या अर्थकारणापेक्षा बदल्यांचे अर्थकारण यांना महत्वाचे वाटतंय.
स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत. असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढेत्यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावर सवाल उपस्थित केले. मला आश्चर्य वाटतं, सरकार मंदिर उघडायला का घाबरतंय? यांना परमेश्वराची एवढी भीती का वाटते?, असा सवाल त्यांनी सरकारला केला. प्रत्येकाचे दैवत आहे. सर्व धर्मांना आपलं स्वातंत्र्य आहे. तुम्ही मदिरालय उघडाला परवानगी दिली मात्र, मंदिर उघडायला परवानगी देत नाही. त्या त्या भागातील अर्थशास्त्र मंदिरावरती अवलंबून आहे. हा भावनिक मुद्दा नसून अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय उध्वस्त झालेत. तुम्ही सर्वार्थाने विचार केला पाहिजे, अन्यथा सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा विखेंनी दिला.
अतिवृष्टी मुद्यावर बोलताने विखे म्हटले की, सरकारला उशिरा जाग आलीये. संपूर्ण शेतकरी उध्वस्त झाल्यानंतर आज सरकार त्यांना मदत करायला निघाले आहे. परंतू सरकारची मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतीये का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांनी शेतीमाल पाण्यात उभा राहून काढला तर काहींचा वाया गेला, हे पंचनामे करताना लक्षात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमचे निर्णय होईपर्यंत पीक तसेच ठेवायचे का?. असे एक ना अनेक प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित केले..
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…