Salary of central employees doing work from home will not be deducted, Modi government's decision
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारवाढीसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर दिले आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा केंद्र सरकारसमोर प्रस्ताव आहे का, जेणेकरुन त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू करता येतील का, असा प्रश्न लोकसभेत अर्थमंत्र्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी म्हणाले की, 8 वा वेतन आयोग गठीत करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, महागाई पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलते. ज्यामध्ये दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात वाढ होते.
1947 पासून 10 वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करते, ज्यांच्या शिफारशीच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवले जाते. यूपीए सरकारने २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सातवा वेतन आयोग स्थापन केला होता. 2006 आणि 2016 मध्ये सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याची शिफारस केली होती आणि ती मान्य करून सरकारने पगारात वाढ देखील केली होती.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…