देश

पतीला घर विकायला भाग पाडलं, पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली, पतीने उचललं टोकाचं पाऊल…

उत्तर प्रदेश : पत्नीने विश्वासघात केल्यामुळे व्यथित झालेल्या राम गोपाल प्रजापती (वय ५५) यांनी १५० फूट खोल खाणीत उडी घेत आत्महत्या केली. झांसी जिल्ह्यातील रक्सा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने अगोदर पतीला घर विकण्यास भाग पाडले. त्यानंतर घर विकून मिळालेले पैसे घेऊन ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पत्नीने केलेल्या या विश्वासघातामुळे राम गोपालला दुखी झाला आणि त्याने आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, राम गोपाल यांचे २५ वर्षांपूर्वी निशा नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. कुटुंबात सगळं व्यवस्थित चाललं होतं. मात्र, काही काळापूर्वी निशाचे एका इतर पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. दरम्यान, ६ महिन्यांपूर्वी निशाने आपल्या पतीला घर विकण्यास भाग पाडले. हे घर ११ लाख रुपयांना विकले गेले. त्यानंतर, निशा आपल्या प्रियकरासोबत दोन्ही मुलांना घेऊन पळून गेली. निशा घराचे पैसेही सोबत घेऊन गेली. त्यानंतर दोघांचे लग्नही झाले. मात्र, या सर्व घटनांमुळे राम गोपाल हे खूप काळजीत आणि तणावात होते.

राम गोपाल हे मानसिक तणावात होते. १९ एप्रिल रोजी ते त्यांच्या बहिणीकडे डेली गावात गेले. तिथे ते त्यांच्या १४ वर्षांच्या भाचीला म्हणाले की, “आज माझा शेवटचा दिवस आहे.” यानंतर त्यांनी गावाजवळील एका १५० फूट खोल खाणीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राम गोपाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना झांसीचे पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, “मृताच्या कुटुंबीयांनी, पत्नीने केलेला विश्वासघात या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पुढील तपास सुरू आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago