Fatal Tanker Accident in Pune Claims Young Doctor
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील सातववाडी पीएमपी बस थांब्यासमोर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. डॉ. ईश्वर साहू (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ रा. छत्तीसगड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, डॉ. साहू हे त्यांच्या दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात असताना, एका थांबलेल्या पीएमपी बसच्या मागे थांबले होते. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डॉ. साहूंनी हेल्मेट परिधान केलेले होते, मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की टँकरचे चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ पोलिस व रुग्णवाहिकेला पाचारण केले. डॉ. साहूंना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात टँकर चालक राजेंद्र एकनाथ तळेकर (वय ५१, रा. वीर, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटकही करण्यात आली आहे. अप्पासो भीमराव सबळकर (वय ४०, रा. वेताळबाबा, गाडीतळ, हडपसर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
डॉ. ईश्वर साहू हे मूळचे छत्तीसगड येथील रहिवासी होते. त्यांनी आयुर्वेदाचार्य (BAMS) शिक्षण पूर्ण केले होते आणि पुढील शिक्षण व व्यावसायिक अनुभवासाठी ते सध्या पुण्यात वास्तव्यास होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…