महाराष्ट्र

पुण्यातील 51 शाळा बोगस असल्याचा मोठा खुलासा, पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे : राज्यातील शालेय शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 51 अनधिकृत शाळा बोगस असल्याचे उघड झाले आहे. अलिकडच्या मूल्यांकनानंतर राज्यभरातील सुमारे 1300 संशयित शाळांची छाननी करण्यात आली. त्यात 800 हून अधिक शाळांमध्ये कागदपत्रांत त्रुटी आढळल्या, तर यापैकी 100 शाळा आधीच कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थी कल्याण आणि शैक्षणिक वैधतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या आधी विभागाने 1300 संस्थांमध्ये तपासणी केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची प्रत्यक्ष संख्या सध्या उघड झालेल्या आकड्यांपेक्षा बरीच जास्त असू शकते. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विभागाने राज्यात बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचा संशय असलेल्या सुमारे 1300 शाळांची तपासणी केली आहे. सुरुवातीला 800 हून अधिक शाळांमध्ये कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. पुण्यात 51 शाळा बोगस असल्याचे निश्चित झाले आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पालकांनी कोणत्याही संशयास्पद शाळांची माहिती विभागाला द्यावी, असं आवाहनही अधिकाऱ्यांनी केलं आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण आयुक्तांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे येथील सर्व बेकायदेशीर शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशात या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये सामावून घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तथापी, शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

शाळेची नोंदणी स्थिती तपासण्यासाठी पालकांना युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (udiseplus) पोर्टल वापरण्याचे आवाहन विभाग करत आहे.

वैध शाळांकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:

  • वैध ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)
  • राज्य मंडळ किंवा सीबीएसई/आयसीएसई संलग्नता कागदपत्रे
  • राज्य सरकारने जारी केलेले इरादा पत्र

या सर्व कागदपत्रांची पुष्टी केल्यानंतरच प्रवेश घेतला पाहिजे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago