देश

आसाराम बापूंना कोरोनाची लागण, ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल

जोधपूर : आसाराम बापूंना कोरोनाची लागण झालीआहे. जोधपूर कारागृहात त्यांची चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तापामुळे आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

रुग्णालयात आणण्यापूर्वी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. आसाराम यांना रुग्णालयात आणताच अनेक समर्थक तेथे पोहोचले. पण पोलिसांनी कोणालाही आत जाऊ दिले नाही. हॉस्पिटलमध्ये आणताना आसाराम व्हीलचेयरवर दिसले. त्यांचे वजनही पूर्वीपेक्षा बर्‍यापैकी कमी असल्याचे दिसते.

जोधपूर कारागृहातील काही कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आसाराम यांचीही चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तुरूंगातच आसाराम यांच्यावर उपचार करण्यात आले. पण रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात न्यावे लागले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago