देश

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन

मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. कोरोना झाल्यानंतर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२0 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र चौधरी अजित सिंह उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाची जबाबदारीही हाताळली होती. बड्या जाट नेत्यांमध्ये चौधरी अजित सिंह यांचे नाव घेतले जायचे.

राजकीय कारकीर्द : 

  1. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आजारी पडल्यानंतर १९८६ सालापासून चौधरी अजित सिंह यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १९८६ साली त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.
  2. १९८७ ते १९८८ पर्यंत ते लोकदल (ए) आणि जनता पक्षाचे अध्यक्षही होते. १९८९ मध्ये त्यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर ते जनता दलाचे सरचिटणीस झाले.
  3. १९८९ मध्ये अजित सिंह पहिल्यांदा बागपत मतदारसंघातून लोकसभेत दाखखल झाले.  व्ही पी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळालं.
  4. १९९१ मध्ये पुन्हा एकदा बागपतमधून लोकसभेत पोहचले. यावेळी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं.
  5. १९९६ मध्ये ते तिसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत दाखल झाले. परंतु, यानंतर मात्र त्यांनी काँग्रेस आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  6. १९९७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची स्थापना केली. १९९७ मध्ये उपनिवडणुकांत बागपत मतदारसंघातून पुन्हा निवडून येत ते लोकसभेत पोहचले. १९९८ मध्ये निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
  7. १९९९ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेत दाखल झाले.
  8. २००१ ते २००३ पर्यंत अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये चौधरी अजित सिंह मंत्री राहिले.
  9. २०११ मध्ये ते यूपीएमध्ये सहभागी झाले.
  10. २०११ ते २०१४ पर्यंत ते मनमोहन सरकारमध्येही मंत्री होते.
  11. २०१४ ते मुजफ्फरनगर मतदारसंघातून लढले परंतु, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
  12. २०१९ सालीही निवडणुकीत मुजफ्फरनगरमध्ये भाजपचे उमेदवार संजीव बलियान यांनी त्यांचा पराभव केला.

शेतकरी आंदोलनाचा त्यांना फायदा मिळाला. जिल्हा पंचायत निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाला जनतेनं उचलून धरल्याचं दिसून आलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago