Veteran actress Sripradha dies due to Covid19
अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, कोविडसंबंधित गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर त्यांचे निधन झाले. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (CINTAA) सरचिटणीस अमित बहल यांनी श्रीप्रदा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
अभिनेत्री श्रीप्रदा यांनी अभिनेता गोविंदा, धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि रवी किशन यासारख्या ख्यातनाम कलाकारांसोबत काम करणे होते. त्यांनी बॉलिवूड आणि भोजपुरी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये यश संपादन केले होते. 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार्या श्रीप्रदाने ‘आग के शोले’, ‘खून की प्यासी’, ‘बेवफा सनम’, ‘वक्त की रफ्तार’, ‘बंटवारा’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण ‘पुराना पुरुष’ सारख्या चित्रपटातून केले आणि पुढे जाऊन ‘धरम संकट’ सारख्या चित्रपटात काम केले. श्रीप्रदाने करिअरमध्ये सुमारे 70 चित्रपटांत काम केले.
अमित बहल म्हणाले कि, “श्रीप्रदाने दक्षिण आणि हिंदी चित्रपटातही अविश्वसनीय काम केले आहे. आपण एक अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्री गमावली, हे फार दुर्दैवी आहे. तिच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आणखी मौल्यवान आयुष्य हिसकावू नये.”
नेटिझन्सने ट्विटरवर शोकसंदेश दिले आहेत. आग के शोले, बटवारा, शैताणी इलाका, उमर 55 की दिल बचपन का, भाग्यवान, आजमाईश, बेवफा सनम आणि टीव्ही मालिका झी हॉरर शो आणि अपराजिता, हे श्रीप्रदा यांचे काही उल्लेखनीय कामं आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…