Anti Covid Drug 2DG Launched In India
नवी दिल्ली : आपत्कालीन वापरासाठी DRDO चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध आज (१७ मे) लॉन्च करण्यात आलं आहे. आता हे औषध रुग्णांना देता येणार आहे. लॉन्चच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून कोरोना रुग्णांना देण्यात येईल. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना दिले जाईल.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासह DRDO च्या न्यूक्लियर मेडिसिन आणि अलाइड सायन्सेस (INMAS) संस्थेने हे औषध तयार केले आहे. क्लिनिकल संशोधनादरम्यान, 2DG औषधाचे 5.85 ग्रॅमचे पाउच तयार केले गेले. त्याचे प्रत्येक पाउच सकाळी आणि संध्याकाळी पाण्यात विरघळवून रुग्णांना दिले गेले. त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. ज्या रुग्णांना हे औषध दिले होते, त्यांच्यामध्ये जलद पुनर्प्राप्ती दिसून आली. ते लवकर बरे झाले. त्या आधारावर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
डीआरडीओ अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की देशभरातील 27 रुग्णालयांमध्ये या औषधाची अंतिम चाचणी घेण्यात आली होती. तेथे उरलेला साठा देखील गोळा करण्यात आला आहे. त साठा आता दिल्ली येथील DRDO हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात येणार आहे. ही औषधे त्वरित दिल्लीत आणण्याचे काम सुरू आहे.
सध्या हे औषध रूग्णालयात फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिले जाईल. सध्या या औषधाच्या केवळ आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. जोपर्यंत या औषधाला सामान्य वापराची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत तरी हे औषध बाजारात येणे शक्य नाही.
दिलासादायक : DRDO च्या 2-DG औषधाला DGCI ने दिली मंजुरी, औषधाचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…