काम-धंदा

SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय क्लर्क भरती अर्जांसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

भारतीय स्टेट बँक (SBI) ने एसबीआय क्लर्क भरती (SBI Clerk Recruitment) 2021 साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. अर्जांची मुदत आज (१७ मे २०२१ संपणार होती. परंतु, ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय क्लर्क भरती 2021 साठी अर्ज केला नसेल, ते आता २० मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

योग्य आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्लर्क भरती प्रक्रियेत ज्युनियर असोसिएटची एकूण ५२३७ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा :

  1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : २७ एप्रिल २०२१
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत : २० मे २०२१
  3. प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर : २६ मे २०२१
  4. पूर्व परीक्षा : जून २०२१
  5. मुख्य परीक्षा : ३१ जुलै २०२१

आवश्यक पात्रता :

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी मिळायला हवे.

वयोमर्यादा : २० ते २८ वर्षे
उमेदवारांचा जन्म २ एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या तारखेनुसार होईल.

वेतन : १७,९०० रुपये – ४७,९२० रुपये.

बेसिक पे १९,९०० रुपये (१७,९०० रुपये + पदवीधरांना मान्य असणारी दोन आगाऊ वेतनवाढ)

निवड प्रक्रिया :

  1. सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.
  2. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
  3. पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.

SBI Clerk Recruitment 2021 भरतीसंबंधीचे संपूर्ण नोटिफिकेशन

SBI क्लर्क भरतीच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती देणारे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago