देश

हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंग कोड वापरले जातात. आपण ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्टबद्दल ऐकलं असेलच. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग येणार्‍या धोक्याच्या तीव्रतेशी कसे संबंधित असतात आणि हे कोण सूचीबद्ध करते? आज आपण याविषयी जाणून घेऊ.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) किंवा हवामान विभाग तीव्रतेशी वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देण्यासाठी चार रंग कोड वापरतात. आयएमडीद्वारे तीव्रतेनुसार देण्यात येणारे हे वेगवेगळे अलर्ट्स ग्रीन ते रेड अशा रंगांमध्ये असतात.

  1. ग्रीन अलर्ट : (सर्व ठीक आहे)
    सल्लागाराची गरज नाही. ‘ग्रीन’ म्हणजे अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
  2. येलो अलर्ट : (जागरूक रहा)
    पुढील काही दिवस खराब हवामान असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार “अपडेट रहा” असा सल्ला दिला जातो.
  3. ऑरेंज अलर्ट : (तयार रहा)
    हवामान अत्यंत खराब होण्याची शक्यता आहे. जीव व मालमत्तेस धोका उद्भवू शकतो. अधिकाऱ्यांना “तयार रहा” अशी सूचना दिली जाते. ऑरेंज अलर्ट दरम्यान खराब हवामान आणि मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो.
  4. रेड अलर्ट : (कारवाई करा)
    ‘रेड’ अ‍ॅलर्ट म्हणजे अत्यंत वाईट हवामान अपेक्षित आहे. ही एक चेतावणी असते आणि अधिकाऱ्यांना “कारवाई करा” अशा सूचना असतात. रेड अ‍ॅलर्ट अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवतो. येत्या 24 तासात 200 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना थेट कारवाई करण्याच्या सूचना असतात.

पावसाची पातळी :

हवामान विभागाच्या मते, 15.6 मिमी ते 64.4 मिमी पाऊस हा “मध्यम” स्वरूपाचा मानला जातो. 64.5 मिमी ते 115.5 मिमी पाऊस “मुसळधार”, 115.6 मिमी ते 204.4 मिमी “खूप मुसळधार” आणि 204.5 मिमीपेक्षा जास्त पाऊस “अत्यंत मुसळधार” मानला जातो.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago