देश

जीप आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 6 जणांची प्रकृती गंभीर

राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, या 12 सीटर जीपमध्ये 18 लोक बसलेले होते. रामदेवरा येथे दर्शन घेतल्यानंतर हे सर्व लोक देशनोक करणी माता येथे दर्शन घेऊन मध्य प्रदेशला निघाले होते. दरम्यान, नागौरहून नोखाकडे जाणारा ट्रेलर आणि जीप यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना तीन जणांचा मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनेक लोकांचे मृतदेह जीपमध्येच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago