A tenth-grader shot another student in a dispute over sitting on a bench
उत्तर प्रदेश : गुरूवारी बुलंदशहरच्या शिकारपूर भागातील इंटर कॉलेजमध्ये दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने भरवर्गात दुसऱ्या विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केलं. आरोपी विद्यार्थ्याने आपल्या लष्करात असणाऱ्या काकांच्या परवानाधारक पिस्तुलाने हल्ला केला. आरोपीने शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु शिक्षकांनी त्याला पकडले. घटनेच्या एक दिवसअगोदर पण बेंचवर बसण्याबाबत दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर शालेय शिक्षकांनी हा वाद मिटविला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आंचरूकला गावात राहणारा रवी कुमार यांचा 14 वर्षीय मुलगा टार्जन सूरजभान हा सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. गुरुवारी तो इतर विद्यार्थ्यांसह शाळेत आला आणि वर्गात बसला होता. अकरा वाजण्याच्या सुमारास जेव्हा तिसरा पिरियड सुरू होणार होता तेव्हा शिक्षक नुकतेच वर्गात आले. तेव्हाच वर्गातील एका विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून एक पिस्तूल काढून टार्जन वर तीन गोळ्या झाडल्या.
टार्जनला दोन गोळ्या लागल्या आणि तो वर्गातच मरण पावला. दरम्यान तेथील धावपळीचा फायदा घेत आरोपी फरार झाला. मात्र, मुख्याध्यापक प्रभातकुमार वर्मा यांनी तत्काळ शाळेचे मुख्य गेट बंद करून पोलिसांना कळविले. याप्रकरणी मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्याध्यापक म्हणाले की, आरोपी विद्यार्थ्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिक्षकांवरही गोळीबार केला, पण ते वाचले. नंतर शिक्षकांनी त्याला पकडून पिस्तुल हिसकावून घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडून चार काडतुसेही जप्त करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपी विद्यार्थ्याने सांगितले की त्याने सकाळी लवकर उठून घरी आलेल्या लष्करात असणाऱ्या काकांची परवानाधारक पिस्तूल चोरली होती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…