देश

शिक्षकाने पार केली निर्लज्जपणाची सीमा, दहावीच्या विद्यार्थिनीसमोर ठेवली अश्लील अट…

राजस्थान : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील लालसोट पोलीस स्टेशन परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी दिली आणि तिच्यासमोर अश्लील अट ठेवत म्हणाला की, तू मला खुश कर, मग मी तुला चांगले गुण देईन. जर माझे ऐकले नाही तर मी तुला नापास करेन. यानंतर मुलीने धाडस करून हा प्रकार घरच्यांना सांगितला, त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला त्याच्या घरातून अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान, आरोपी शिक्षक आपले तोंड लपवत होता. विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास ती शाळेत गेली होती. यादरम्यान शाळेतील इंग्रजी शिक्षक ओमप्रकाश (३०) यांनी मला त्यांच्याकडे बोलावले आणि हाताला धरून जवळच्या रिकाम्या खोलीत नेले. यादरम्यान शिक्षकाने माझे दोन्ही हात घट्ट पकडले आणि मुरगळत राहिला आणि म्हणाला की तू मला खुश करशील तर मी तुला पूर्ण मार्क देईन.

विद्यार्थिनीने सांगितले की, ती इयत्ता पहिलीपासून या शाळेत शिकत आहे. इंग्रजी शिकवणारा, विनयभंग करणारा ओम प्रकाश वर्गातही तिला खूप त्रास देतो. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओमप्रकाश हा सुमारे ४ वर्षांपासून खासगी शाळेत इंग्रजीचा शिक्षक असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

22 तास ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

22 तास ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

22 तास ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

2 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

4 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago