धुळे

एकाच कुटुंबातील 5 जणांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून सर्व जण बचावले असून डायमंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अवधान परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास कौटुंबिक कलहांना कंटाळून ही घटना घडली आहे. गणेश गोपाळ हे आपली पत्नी आणि मुले आणि अन्य एका तरुणासह या परिसरात राहत होते. त्यांनी येथे भाडेतत्वावर घर घेतलेले होते. गणेश आणि सविता यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून दोघांनी लग्न केले होते. पण त्यांच्या या प्रेम संबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केलं. गणेश गोपाळ (42), त्यांची पत्नी सविता (35), मुलगी जयश्री(14), मुलगा गोविंदा गणेश गोपाळ आणि भरत पारधी अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांची नावं आहेत.

दरम्यान, गोपाळ यांनी घडलेला प्रकार घरमालकांना सांगितलं आणि सर्वांनी विष प्राशन केल्याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाचही जणांचे प्राण वाचले आहे. त्यांच्यावर डायमंड वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मात्र, भरत पारधी यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago