देश

वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू, मृतदेहांची अवस्था बघता घटनास्थळीच करणार शवविच्छेदन

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे. टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडलेल्या सुखीधांग-डांडामीनार रस्त्यावर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स या गाडीमध्ये बसलेले सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळेत झालेल्या लग्नात सहभागी होऊन घरी परतत होते. मात्र, काल रात्री 3.20 च्या सुमारास मॅक्स गाडी अनियंत्रितपणे खोल दरीत कोसळली.

दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे वाहन चालकाचा वाहनाचा तोल गेला, त्यामुळे वाहन दरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. हा अपघात बुडामपासून तीन किलोमीटर पुढे झाल्याचे सांगण्यात येत आहे. 16 पैकी 14 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सर्व 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काहींची ओळख पटली आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पाच वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेला चालक व अन्य एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत व्यक्ती काकनई येथील दांडा आणि काथोटी गावातील आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मॅक्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहांची अवस्था बघता घटनास्थळीच मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago