little boy died
झारखंड : झारखंड मधील गुमला येथे बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, त्यानंतर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
झारखंड मधील गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपूर गावात ही घटना घडली. मंगळवारी महानवमीनिमित्त गावातील देवी मंडपात एकामागून एक बोकडांचा सार्वजनिक बळी दिला जात होता. यादरम्यान धारदार शस्त्राने 4 वर्षीय बालक विमल ओराव याच्या अंगावर वार झाला. यात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला घाघरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र वाटेतच बालकाचा मृत्यू झाला.
येथील प्रत्येक गावात दुर्गापूजेदरम्यान देवी मंडपात बकऱ्यांचा बळी देण्याची परंपरा आहे. मंगळवारी घटनेपूर्वी दोन बकऱ्यांचा बळी दिला गेला. त्यानंतर तिसर्या बकऱ्याच्या मानेवर वार करताना धारदार शस्त्राचा भाग तुटून गर्दीत उभ्या असलेल्या विमल दीपक ओराव या 4 वर्षांच्या मुलाच्या छातीवर आदळला. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच घाघरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अमित चौधरी पथकासह गावात पोहोचले. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गुमला सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर, मृत विमल ओरावची आई बिरसी देवी आणि वडील दीपक ओराव यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…