देश

जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा सुरु, परंतु ‘या’ अटीसह मिळणार सुविधा

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतरपासूनच या भागात 4G इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ज्यानंतर आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

तथापि, सरकारच्या आदेशात हे स्पष्ट करण्यात आले आहे कि, प्रीपेड सिमकार्डवर हाय स्पीड इंटरनेटची सुविधा नंबर व्हेरिफिकेशन नंतरच देण्यात येईल. यासाठी असलेली प्रक्रिया पोस्ट पेड क्रमांकासाठी असलेल्या प्रक्रियेसारखीच असेल. जम्मू-काश्मीर प्रशासन हाय स्पीड सुविधेवर अंकुश ठेवणार आहे. कारण या भागात इंटरनेट वापराचे अनेक धोके आहेत. त्यामुळे सुरक्षाविषयी सरकारला कोणतेही आव्हान घ्यायचे नाही.

सदर भागात इंटरनेट सेवा सुरु करण्याची माहिती समोर आल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हटलं कि, 4G मुबारक! 2019च्या ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमघ्ये 4G मोबाईल डेटा वापरता येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago