19-year-old woman arrested for marrying a minor boy
चेन्नई : तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका 19 वर्षाच्या तरुणीने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक देखील करण्यात आली आहे. या तरुणीला पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केलं होतं. यानंतर तिला कोईम्बतूर मध्यवर्ती कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीने दहावीत नापास झाल्यानंतर शिक्षण सोडून कोईम्बतूरच्या पोलाचीमध्ये पेट्रोल पंपावर नोकरी करण्यास सुरुवात केली. बारावी शिकलेला एक मुलगाही त्याच पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. दरम्यान, या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. तरुणीचं अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं आणि त्यानंतर ती त्याच्यासोबत डिंडिगुल येथे पळून गेली. तिथे या दोघांनी लग्न केलं आणि पुन्हा कोईम्बतूरला आले. तिथे दोघेही भाड्याच्या घरात राहू लागले. परंतु, या अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांकडे जाऊन या तरुणीविरुद्ध मुलाचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली. या तरुणीला तक्रारीबाबत माहिती होताच तिने स्वतः महिला ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी सांगितलं की या तरुणीला अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्यामुळे अटक केली आहे. त्याचबरोबर 17 वर्षीय मुलासोबत लग्न करून त्याचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही तरुणी सध्या जेलमध्ये आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या दोघांनाही योग्य समुपदेशनाची गरज आहे.”
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…