Man cuts off own penis during police chase
वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेनेसी येथे एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. येथे पोलीस एका संशयित आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यावेळी या आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि कारबाहेर फेकून दिला. हे पाहून पोलिसही चक्रावले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे, ज्याला टेनेसी राज्याच्या डॉवेलटाउन पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. स्थानिक पोलीस या आरोपीला अटक करण्यासाठी आले होते. त्यावेळी हा आरोपी कारमध्ये होता. अचानक त्याला त्याच्या मागे पोलिसांच्या गाड्या येताना दिसल्या. त्यानंतर तो आपली कार घेऊन तेथून पळत असताना पोलिसांच्या मोठ्या टीमने त्याचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे हा आरोपी खूप गोंधळला. त्यानंतर या आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि कारबाहेर फेकून दिला.
टायसनने केलेले हे कृत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले. काही वेळाने जेव्हा टायसनच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्त्राव सुरू झाला, तेव्हा त्याने उपचारासाठी मदत मागत आपली कार थांबवली. जेव्हा टायसनने दरवाजा उघडला तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. सायरनचा आवाज ऐकल्यानंतर घाबरून या आरोपीला काय करावे ते सुचले नाही आणि त्याने हे विचित्र कृत्य केले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…