महाराष्ट्र

अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने दिले चुकीचे औषध…

ठाणे : अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने तिला चुकीचे औषध दिल्यामुळे प्रेयसीची प्रकृती बिघडली व ही बाब तिच्या कुटुंबीयांपुढे आली. त्यानंतर बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस दिलेल्या माहिती नुसार, शुभम छोटू कटरे (वय २४, रा. मौदा) याची सतरावर्षीय मुलीशी ओळख झाली.  १ जानेवारी २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला आहे.  यातून तिला गर्भधारणा झाली. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे शुभमला समजले. यामुळे आपले बिंग फुटणार, हे लक्षात येताच त्याने तिचा गर्भपात करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तिला औषध आणून दिले. या औषधांमुळे या मुलीची प्रकृती अचानक ढासळली. अखेर हा प्रकार या मुलीच्या कुटुंबीयांपुढे आला.

बिघडलेली प्रकृती लक्षात घेता तिचा गर्भपात करणे अत्यावश्यक झाले होते. अखेर तिच्या संमतीने भंडारा येथील सामान्य रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शुभमवर बालकांचे लैंगिक आजारापासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 आठवडे ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

2 आठवडे ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

2 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

1 महिना ago