महाराष्ट्र

टेंभुर्णी – लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात, माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश

लातूर : लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गायकवाड यांनी जानेवारी २०१८ च्या लोकसभा अधिवेशनात टेंभुर्णी ते लातूर हा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन करून लवकरात लवकर महामार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून टेंभुर्णी – लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी टेंभुर्णी ते लातूर महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे महाराष्ट्र चे तत्कालीन सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे जाहीर आभार मानले आहेत.

या महामार्गामुळे मुंबई, पुण्याहून लातूर, नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना खूप सोयीचे होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे अनेकजणांनी माजी खासदार डॉ गायकवाड यांचे आभार मानले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago