मनोरंजन

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा संपन्न, दोघांनी शेअर केले लग्नातील फोटो

मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाहसोहळा आज (१५ नोव्हेंबर) संपन्न झाला. त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी दोघांनी त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो शेअर केले. राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाह सोहळा चंदीगडमध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी एक दशकाहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आज त्यांनी लग्न केले. राजकुमारने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्याच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. पत्रलेखाने देखील लग्नातील फोटो शेअर केले आणि चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. पत्रलेखाने 2014 मध्ये सिटीलाइट्समधून राजकुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने त्याला पहिल्यांदा लव्ह सेक्स और धोखा (LSD) चित्रपटात पाहिले होते आणि त्याने तिला एका जाहिरातीत पाहिले होते. राजकुमारबद्दल पत्रलेखा म्हणाली, मी LSD पाहिल्यावर त्याला पहिल्यांदा ऑन-स्क्रीन पाहिले. मला वाटले की त्याने या चित्रपटात ज्या विचित्र माणसाची भूमिका केली आहे तो प्रत्यक्षात देखील तसाच असेल. त्याच्याबद्दलची माझी समज आधीच कलंकित झाली होती. त्याने मला नंतर सांगितले की, त्याने मला पहिल्यांदा एका जाहिरातीत पाहिले होते आणि तेव्हाच मी हिच्याशीच लग्न करणार, असे त्याला वाटले होते. अखेर आज राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न झाले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 महिने ago