नागपूर

गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असे ते यावेळी म्हणाले.

शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सी-60 जवानांकडून 26 नक्षल मारले गेले. याबाबत त्यांचे अभिनंदन करणेकरीता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सी-60 जवानांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सी-60 जवानां सह इतर सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही अभिनंदन केले. पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या अडचणी असतील ते मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करुन सोडविले जाईल. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसलेला आहे. तसेच या कारवाईमुळे देशभरात जे नक्षली संघटना आहेत त्यांनाही जबर हादरा बसला असल्याचे ते यावेळी म्हणाले.

नक्षलविरोधी कामगिरी बजावणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहणार असून त्यांच्या मागण्यांची शासन दखल घेणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी आपल्या संबोधनादरम्यान दिली. यावेळी पोलिसांच्या कडून असलेल्या त्यांच्या मागण्या मी सोबत घेऊन जात आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या काळात जलद गतीने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या नक्षली चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेले यावेळी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्र पुरवठा मी पाहिला असून अतिशय मोठ्या प्रमाणात नक्षली तेलतुंबडे याची सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा त्याला मारण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले हे कौतुकास्पद आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलींनी धडा शिकवण्यात आपल्या राज्याला यश आल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले व अभिनंदनही केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago