लाइफ स्टाइल

Norovirus : नोरोव्हायरस काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय…

Norovirus : देशात कोरोना विषाणूची लस वेगाने दिली जात असली तरी लोक अजूनही कोविड-19 सारख्या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. विशेषत: केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यातच आता तेथील लोकांना एका नवीन विषाणूचा सामना करावा लागत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात आतापर्यंत 13 नोरोव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 15 हून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसत आहेत.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, वायनाड कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेसच्या 13 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांच्यामध्ये जास्त लक्षणे दिसत आहेत. सर्व रुग्ण महिला वसतिगृहात राहतात. त्यांच्यामध्ये जुलाब, उलट्या यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांच्या सभोवताली स्वच्छता राखण्यास सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया या नवीन विषाणूबद्दल…

नोरोव्हायरस म्हणजे काय?

नोरोव्हायरस हा विषाणूंचा समूह आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग होतो. दूषित पृष्ठभाग किंवा अन्नाच्या संपर्कातून एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये तो पसरू शकतो. या विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे अन्न किंवा पाणी आहे. हा विषाणू अत्यंत सांसर्गिक आहे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरू शकतो. याचे कारण म्हणजे नोरोव्हायरसची लागण झालेली व्यक्ती अब्जावधी नोरोव्हायरस कणांना पसरवू शकते.

एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा नोरोव्हायरसची लागण होऊ शकते, कारण नोरोव्हायरसचे अनेक प्रकार आहेत. एका प्रकारच्या नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे इतर प्रकारच्या नोरोव्हायरसपासून संरक्षण मिळत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये एका प्रकारच्या विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होते, परंतु रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोरोव्हायरसचा उद्रेक कधीही होऊ शकतो, परंतु ते जास्त करून नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होतात.

नोरोव्हायरसची लक्षणे काय आहेत?

  1. हा विषाणू पोटात पोहोचताच पोट आणि आतड्यांमध्‍ये सूज येते.
  2. विशेषत: लहान मुलांमध्ये, सहसा अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या यांचा समावेश होतो.
  3. संसर्गाच्या इतर लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश असू शकतो.
  4. हा विषाणू सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. परंतु लहान मुले, वृद्ध आणि अगोदरच इतर आजार असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणे निर्माण होऊ शकतात.
  5. एखाद्या व्यक्तीला विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 12 ते 48 तासांनंतर लक्षणे दिसतात आणि वेळेवर उपचार सुरू केल्यास 1 ते 3 दिवसांत बरे होतात.

उपचार

हा विषाणू अद्याप प्राणघातक मानला गेला नाही, परंतु त्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. अतिसार आणि उलट्यांसाठी सामान्य औषधांच्या मदतीने उपचार केले जातात. नोरोव्हायरस असलेल्या रुग्णांना भरपूर पाणी आणि द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण उलट्या आणि अतिसारामुळे शरीरात पाण्याची कमतरता (गंभीर निर्जलीकरण) होऊ शकते.

नोरोव्हायरसपासून बचाव कसा करायचा?

या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. विशेषत: जे लोक दररोज प्राण्यांच्या संपर्कात येतात, त्यांनी काळजी घ्यायला हवी.

  1. हात साबणाने आणि कोमट पाण्याने चांगले धुवा. विशेषतः अन्न खाण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर.
  2. तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर घरीच थांबा.
  3. अल्कोहोलने नोरोव्हायरस मरत नाही, त्यामुळे सॅनिटायझर तुम्हाला मदत करणार नाही. ब्लीचपासून बनवलेल्या क्लिनरने घर निर्जंतुक करा.
  4. तुम्ही आजारी असाल किंवा तसे वाटत असेल तर ४८ तास तुम्ही अन्न बनवू नका.
  5. नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…

हिवाळ्यात वाढते सांधे आणि हाडांचे दुखणे, ‘या’ उपायांनी मिळेल आराम

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago