लाइफ स्टाइल

अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…

पुणे : थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांची मागणी वाढते. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत असण्यासोबतच ती शरीराला उबदार देखील ठेवतात. बरेच लोक दररोज अंडी खातात. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अंडे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खराब झालेली अंडी कशी ओळखता येतील? तसेच अंडी फ्रीजमध्ये किती दिवस टिकतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया काही महत्वाच्या टिप्स…

अंडी किती दिवस टिकतात?
अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास सुमारे एक महिना चांगली राहतात. तर बाहेर ठेवल्यास 7 दिवस चांगली राहतात. पण दुकानामध्ये किती दिवसांपासून अंडी ठेवलेली होती? आणि ती कधी खराब होतील हे समजणे थोडे कठीण असते. त्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरून त्याची गुणवत्ता तपासू शकतो.

अशाप्रकारे ओळखा अंडी ताजी आहेत की शिळी

फ्लोटिंग टेस्ट : अंडी ताजी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अंड्याची फ्लोटिंग टेस्ट करावी लागते. अंडे थंड पाण्याच्या भांड्यात ठेवा, जर अंडे पाण्यात तळाशी आडवे पडून राहिले तर ते ताजे आहे. जर अंडे खाली जाऊन सरळ उभे राहिले तर ते अंडे काही दिवस जुने आहे परंतु ते खाण्यायोग्य आहे. परंतु, जर अंडे पाण्यात तरंगत असेल तर ते फेकून देणेच चांगले. तरंगणारी अंडी खूपच जुनी असतात. अंडे जुने व शिळे असेल तर त्याच्या आतमध्ये हवेची पिशवी बनते ज्यामुळे ते पाण्यावर तरंगते.

कॅंडल किंवा टॉर्च वापरा : अंडी ताजी आहेत की जुनी हे पाहण्यासाठी आपण कॅंडल किंवा टॉर्च देखील वापरू शकता. यासाठी अंधा-या खोलीत मेणबत्ती किंवा फ्लॅश लाईट खाली अंडे पकडा आणि ते उजव्या बाजूने डावीकडे फिरवा. जर अंड्याच्या आत पिवळा बलक आणि त्याच्या आत हवेची पिशवी तयार झालेली दिसली हवेची पिशवी जर मोठी असेल तर अंड खराब व जुनं आहे. पण ही पिशवी जर आकाराने छोटी असेल तर अंड ताजं व चांगलं आहे.

अंड्यांचा वास : अंडी ताजी व चांगली आहेत का? हे वास घेऊन देखील ओळखता येते. आपण शिजवलेली किंवा कच्ची दोन्ही पद्धतीच्या अंड्यांचा वास घेऊन तपासू शकता. अंडे फोडून एका प्लेटमध्ये घ्या. त्यानंतर त्याचा वास कसा येतो ते बघा, वास ठीक असल्यास त्याचे सेवन करू शकता. पण त्यातून घाण वास आला तर ते tatkal फेकून द्या.

नीट निरीक्षण करा : अंडे बाहेरून नीट पाहा की त्याच्या कवचातून पावडर तर पडत नाही ना? किंवा कुठे छिद्र तर नाही ना? असं बॅक्टेरियामुळे होऊ शकतं. असं वाटल्यास एका वाटीत अंडे फोडून ओता. आता त्यात निळा, हिरवा किंवा काळ्या रंगाची काही घाण दिसत असेल तर ते अंडे ताबडतोब फेकून द्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

10 तास ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago