नाशिक

अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच घडतो यशस्वी उद्योजक – छगन भुजबळ

नाशिक : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला संपर्क कार्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्राचे वाहन वाटप करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनिष कुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबिर, समन्वयक सचिन पवार आदी उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले की, ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून 6 लाख ते 10 लाखांपर्यंत किंमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किंमतीच्या 5 टक्के रक्कम सुरवातीला भरावी लागते. यावर शासनाची 15 टक्केपासून 35 टक्केपर्यंत सबसिडी मिळते. व कर्जाच्या रकमेची 5 वर्षात परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पुजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिनी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, निलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या 16 लाभार्थ्यांना मालवाहतुक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर २५ लाभार्थ्यांना वाहन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago