महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : NCB पथकाचे पुण्यात छापे

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट समोर आल्यानंतर नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या पथकाने शनिवारी पुण्यातील हडपसर व खडकवासला परिसरात छापे टाकले.

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक अंमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्यांबरोबच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात चिंकू पठाण व त्याचा साथीदार आरीफ भोजवाल यांची नावे समोर आली होती. ‘एनसीबी’च्या पथकाने दोघांनाही अटक केली होती.

चौकशीमध्ये राजू सोनावणे हा त्यांचा साथीदार असून त्याची अंमली पदार्थ तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती.  सोनावणे याचे खडकवासला येथील घर आणि हडपसरमधील गोडाउनवर ‘एनसीबी’ने छापे टाकले. पठाण व भोजवाल या दोघांना अटक झाल्यानंतर सोनावणे पळून गेला आहे. त्याच्या घरात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. तो कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतूक करताना अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago