देश

धक्कादायक : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

राजस्थानमधील दौसा येथे अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ढाब्याच्या मालकाने एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौसा येथे राहणाऱ्या या महिलांवर ढाबा चालक विष्णू गुर्जर याने बलात्कार केला. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या महिलेच्या मुलीने आणि तिच्या दोन लहान बहिणींनी त्यांच्यावर देखील आरोपीने जबरदस्ती केल्याचे सांगितले. २१ जानेवारी रोजी महिलेने आरोपी गुर्जर याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी महिलेच्या लहान बहिणीने तक्रार दाखल केली. २३ जानेवारीला महिलेच्या दुसऱ्या बहिणीने पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार केली. त्यानंतर २४ जानेवारीला महिलेच्या मुलीने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दिली.

माहितीनुसार, आरोपीने आधी पीडित महिलेच्या घरातील अन्य सदस्यांशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने महिलेसह तिच्या दोन बहिणी आणि मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने या चौघींवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी चार गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago