देश

RBI खरंच बाद करणार का 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा?

पुणे : आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं. सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं.

आरबीआयकडून मार्च २०२१ पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये केला जातोय, मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नाहीये” असं पीआयबीकडून सांगण्यात आलंय. याशिवाय, “आरबीआयकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही” असंही पीआयबीने स्पष्ट केलंय. ट्विटरद्वारे ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने ही माहिती दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago