Bhagwangad Dussehra Melawa: Such help is not enough, the loss of farmers is huge - Pankaja Munde
अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे. भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे म्हटल्या कि विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई, एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत, अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.
पुढे त्या म्हटल्या कि खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. अपप्रचार सुरू होता. पण, करोना काय मी आणला का? करोनात जबाबदारीनं वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. जिवंत असेपर्यंत भगवान गडावर येत राहिन.
अतिवृष्टीमुळं शेतकरी बेजार झाला आहे. मी सरकारकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. सरकारनं १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नाही. शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं आणखी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…