क्रीडा

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने IPL च्या दोन हिरोंना सलाम करत केले भावनिक ट्विट

मुंबई : IPL 2020 स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाला कोलकाताविरूद्ध ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वरुण चक्रवर्तीची फिरकीपुढे दिल्ली बेजार झाल्यचं दिसून आलं. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाने १२६ धावांचा बचाव करत १२ धावांनी थरारक विजय मिळवला. ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग आणि इतर फिरकीपटूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव गडगडला. या दोन्ही सामन्यात जिंकणाऱ्या संघाला विजेतेपणासोबतच भावनिक स्पर्श होता. याच संदर्भात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक भावनिक ट्विट केलं.

नितीश राणाचे सासरे सुरिंदर मारवाह यांचं काही दिवसांपूर्वी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झालं. त्यामुळे नितीशने आपल्या सासऱ्यांना अर्धशतक समर्पित केलं. दुसऱ्या सामन्यात पंजाबने मयंक अग्रवालच्या जागी मनदीप सिंगला संधी दिली. आदल्या रात्री (शुक्रवारी) मनदीपच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण व्हिडीओ कॉलवरून अंत्यसंस्काराला हजेरी लावल्यानंतर तो संघासाठी मैदानात उतरला. या दोन IPLच्या हिरोंना सचिनने सलाम केला.

जवळच्या माणासाच्या निधनाने दु:ख होतंच, पण त्यांना शेवटचा निरोप देता आला नाही तर जास्त वाईट वाटतं. मनदीप आणि नितीश या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती इश्वर देवो ही प्रार्थना करतो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे अशा परिस्थितीदेखील संघासाठी मैदानावर उतरल्याबद्दल दोघांना मी सलाम करतो”, असं सचिनने ट्विट करत सांगितलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago