महाराष्ट्र

कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी

शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

डॉ. सुजय विखे म्हणाले कि नगरमधील बहुतांश विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. शहर व परिसरातील बहुतेक विकासकामे संरक्षण खात्याशी निगडित आहेत. के. के. रेंजचा प्रश्‍न, कॅंटोन्मेंट परिसराचा प्रश्‍न, उड्डाणपूल, जामखेड, पाथर्डी व सोलापूर रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येक वेळी दिल्लीला संरक्षण विभागात जावे लागते. ही कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. अशी मिश्किल टिप्पणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

काॅंग्रेसचे राज्यातील नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेत नुकतेच पक्षांतर झालेले मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे भाचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विखे पाटील यांनी नाव न घेता टीका केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago