महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार, दोघांना समोरासमोर बसवून चौकशीची शक्यता

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आज ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहारानंतर हे समन्स जारी करण्यात आले होते. ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून दोघांची चौकशी करू शकतात.

गुरुवारी न्यायालयात न्यायाधीश देशपांडे यांनी राऊत यांना काही अडचण आहे का, असे विचारले असता राऊत म्हणाले, मला ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे तेथे खिडकी व वायुवीजन नाही. त्यावर न्यायालयाने ईडीच्या वकिलांकडून स्पष्टीकरण मागितले. ईडीच्या वकिलांनी सांगितले की, राऊत यांना एसी (वातानुकूलित) खोलीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तिथे खिडकी नाही. त्यानंतर राऊत यांनी कबूल केले की खोलीत एसीची व्यवस्था आहे, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते वापरू शकत नाहीत.

राऊत यांच्या संपर्कांवर ईडीची नजर
अंमलबजावणी संचालनालय पत्रा चाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या संपर्कांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषत: प्रवीण राऊत, सुजित पाटकर आणि राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत, याचा तपास सुरू आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर झाले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात १.६ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago