क्रीडा

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जिंकलं सुवर्णपदक, राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

बर्मिंगहम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे.

टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात देशासाठी सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्ण आहे. २०१८ मध्येही त्याने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१४ मध्ये त्याने ६१ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्येही त्याची दोन सुवर्णपदके आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे सातवे सुवर्ण आणि एकूण २२ वे पदक आहे. कुस्तीमध्ये बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले होते.

बजरंग पुनियाविरुद्धच्या राउंड ऑफ १६ सामन्यात लोवे बिंघम त्याच्यासमोर होता. बजरंगने अवघ्या दोन मिनिटांत सामना जिंकला. यानंतर बजरंगने मॉरिशसच्या जीन बांडोविरुद्धही सहज विजय मिळवला. त्याने उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंडच्या जॉर्ज रामचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. या वर्षी एप्रिलमध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवले होते. दुखापतीनंतर कठोर संघर्ष केल्यानंतर मे महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago