छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या चकमकींदरम्यान शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात किराडपुरा परिसरात घडलेल्या घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 3500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घटनेबाबत सोशल मीडियावर कोणीतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास प्रशासनाच्या वतीने गंंभीर दखल घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडेय म्हणाले, दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आहे. आता शहरात पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली आहे. मी शहरवासियांनी आवाहन करतो की आता येणाऱ्या सर्व सणांमध्ये, महावीर जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, ईदचा पवित्र महिना आहे. हे सगळे सण शांततेने आणि आनंदाने साजरे करा. जे समाजकंटक आहेत त्यांच्यासाठी इशारा आहे, जो कोणी बेकायदेशीर काम करत आहे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.
सध्या शहरात 3 हजार 500 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले. किराडपुरा परिसरात झालेल्या दंगलीनंतर पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी राम मंदिराला भेट देत घटनास्थळाची पहाणी केली. घटनेचा पोलिसांकडून आढावा घेतला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…