पुणे

पुणे : फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. ओम कापडणे (१९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होता. ओम नाशिकहून पुण्यात शिक्षणासाठी आलेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा कॉलेजच्या आवारात असलेल्या विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी (27 जुलै) त्याने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. दरम्यान, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चतु:शृंगी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

ओम पुण्यातील विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. तो फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

6 तास ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

6 तास ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

6 तास ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

7 तास ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

3 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

3 आठवडे ago