महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण, जाणून घ्या महत्वाच्या बाबी…

मुंबई : राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेला व संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी या संस्थेत दिव्यांगांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे :
सर्टिफिकेट इन कम्प्युटर ऑपरेशन विथ एम एस ऑफिस यासाठी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास, मोटर अँड आर्मेचर वाइंडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स यासाठी किमान नववी पास पात्रता आहे. यासाठीची वयोमर्यादा 16 ते 40 वर्षापर्यंत आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून फक्त दिव्यांगांनाच यात प्रवेश दिला जाणार आहे.

अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी निदेशक तसेच समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना इत्यादी सोयी सवलती देण्यात येत आहे.

अर्ज कोठे व केव्हा करावा :
अभ्यासक्रमासाठी माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह टाकळी रोड म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ मिरज, जिल्हा सांगली या पत्त्यावर किंवा समक्ष मोफत मिळतील. अर्ज प्राप्त झाल्यावर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • दहावीची गुणपत्रिका
  • अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • युडीआयडी कार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago