महाराष्ट्र

हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज जारी करण्यात आला. इतकंच नाहीतर आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड आणि रत्नागिरीला मात्र आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई उपनगरांसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. ९ ते १३ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनानेही सतर्क राहत योग्य ती योजना आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर आणि अलिबागमध्ये पूर येण्याचा धोका आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, महाबळेश्वर आणि रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्राच्या लाटांची उंची 10 मीटरपर्यंत जाऊ शकते, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago