महाराष्ट्र

चिमुकल्याच्या हट्ट… मुस्लीम कुटुंबात विराजमान झाले गणपती बाप्पा

चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली. हा प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला.

अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.

अस्लम शेख यांनी फेसबुकवर लिहिलंय…

“आज दुपारी ग्रामीण भागात कामानिमित्त गस्तीवर असताना बायकोचा फोन आला. माझा मुलगा अब्रार गणपती आणायचा म्हणून हट्ट करतोय आणि खूप रडतोय अस तिचा निरोप. आधी हसू आलं ऐकून. मुसलमानांच्या घरी गणपती हा विचार माझ्या डोक्यात… मागच्या वर्षी मी, रवी, बाबळे सर सोबत आमची चिमुकली मुले बाबळे सरांचा गणपती आणायला गेले होते. यावर्षी रवी आणि बाबळे सर बदलून गेले त्यामुळे गणपती आणायला गेलो नाही. पण त्या लहान लेकराला काय कळतंय मुसलमान काय आणि गणपती काय… लहानपण देगा देवा म्हणतात ते खरंच आहे. मी तिला म्हटलं त्याला सांग मी घरी आलो की आणू गणपती. वेळ मारून नेण्यासाठी तेवढंच काय ते कारणं. मग थोड्या वेळाने बायकोने व्हाट्सएप ला फोटोच पाठवला. श्रींची मूर्ती माझ्या घरी विराजमान झालेली. प्रस्थापित मानसिकतेमुळे जे शक्य होत नाही असं वाटत होतं ते प्रामाणिक निरागसतेनं केलं. संध्याकाळी सर्वांनी सोबत बाप्पाची आरती केली. जर त्याच्या मनात आलं तर बाप्पा मुसलमानांच्या घरी सुद्धा आनंदाने येतो आणि त्याला आणल्यावर आनंद पण सोबत येतो याची आज प्रचिती झाली. अब्रार खूप खुश आहे बाप्पासोबत. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहू दे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा.
#गणपती_बाप्पा_मोरया

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 तास ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago