महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येणार असून सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केला होता.

सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत वाहन विराजित यंत्रसामग्रीच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने मलनिःसारण वाहिन्यांचे परिरक्षण करण्यात येते. तसेच मोठ्या नाल्याची सफाई प्रामुख्याने यंत्रसामग्रीचा वापर करून करण्यात येते. परंतु ज्या ठिकाणी यंत्रसामग्री वापरता येणे शक्य नाही, अशा पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई अपवादात्मक परिस्थितीत कंत्राटदारांमार्फत नियुक्त केलेल्या कामगारांच्या सहाय्याने, सुरक्षिततेचे उपाय करून करण्यात येते.

महानगरपालिकेतील 29 हजार 700 सफाई कामगारांपैकी 5 हजार 592 सफाई कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवासदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भूखंडावर आश्रय योजनेंतर्गत पुनर्विकास करून 12 हजार घरे बांधण्याची कार्यवाही महानगरपालिकेतर्फे सुरू आहे. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन आहेर, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago