Uday Samant
मुंबई : औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून आवश्यक तो निधीही देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक निधीअभावी प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.
सामंत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याकरिता शासनाकडून 35.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 23 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मृती वन व स्मारकाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. अद्यापपर्यंत या प्रकल्पावर 9.40 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे. या स्मारकाच्या प्रलंबित कामांच्याबाबत आजच मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही सामंत यांनी सांगितले. या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…