महाराष्ट्र

अँटिलिया केसमध्ये धक्कादायक खुलासा, घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेलीग्राम चॅनेलचे लोकेशन तिहाड जेल

मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. आता या घटनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपित दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद ने टेलिग्राम चॅनलवरून अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ते चॅनेल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बनविण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला अशी माहिती मिळाली आहे की खासगी सायबर एजन्सीला तपास एजन्सीने फोन ट्रॅक करण्यास सांगितले. हा तोच फोन होता ज्यावर टेलीग्राम चॅनेल बनविला गेला होता. केंद्रीय एजन्सींनी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला ही माहिती दिली असल्याची माहिती आहे. खासगी सायबर फर्मने तयार केलेल्या सुरक्षा विश्लेषणाच्या अहवालानुसार, हे टेलिग्राम चॅनेल 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ‘टार’ नेटवर्कद्वारे तयार केले गेले. ज्याचा वापर डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो. हे ज्या सिमकार्डद्वारे केले गेले त्याचे लोकेशन तिहार जेलमध्ये येत आहे. (डार्क वेब इंटरनेटचा एक असा भाग आहे ज्यामध्ये केवळ TOR सारख्या अज्ञात नेटवर्कद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो, पारंपारिक सर्च इंजिनद्वारे नाही.)

काय घडलं होतं ?

28 फेब्रुवारी रोजी ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाच्या बाहेर उभी केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, यानंतर दुसर्‍याच दिवशी ‘जैश-उल-हिंद’ ने दुसर्‍या टेलिग्राम वाहिनीवरून एक पोस्टर जारी केले आणि यात त्यांच्या संघटनेचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यात म्हटलं होतं कि, “आम्हाला पोस्टरवरून हे स्पष्ट करायचे आहे की जैश-उल-हिंदचा या घटनेशी काही संबंध नाही. मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेरची घटना, कथित टेलिग्राम खाते आणि पत्राशी आमचा काहीही संबंध नाही. बनावट पोस्टर लावल्याबद्दल आम्ही भारतीय गुप्तचर संस्थांचा निषेध करतो. आम्ही कुफ्रास (जे देवावर विश्वास ठेवत नाहीत) त्यांच्याकडून कधीच खंडणी घेत नाहीत आणि भारतीय व्यावसायिक जगतातल्या टायकून्सशी आमचा लढा नाही. आमचा लढा भाजप आणि संघाविरोधात आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago